#satara #sidhnath #jogeshvari #festival #maharastra
लाखो भाविकांचे कुलदैवत व श्रध्दास्थान असलेले सातारा जिल्ह्यामधील म्हसवड येथील श्री सिध्दनाथ देवी जोगेश्वरी मंदीर देवस्थानचा पारंपारिक शाही विवाह सोहळा सोनवारी रात्री बारा वाजता संपन्न झाला. कार्तिक प्रतिपदा दिपीवली पाडवा ते मार्गशिर्ष प्रतिपदा देवदिवाळी दरम्यानच्या एक महिन्याच्या कालावधीचा विविध धार्मिक कार्यक्रमाने हा विवाह सोहळा संपन्न होत असतो. तुलशी विवाह कार्तिक बारस रात्री हा श्रीचा विवाह सोहळा प्रतिवर्षी संपन्न होत असतो. श्रींच्या या मंगलमय शाही विवाह सोहळ्यानिमित्त मंदीर शिखर व परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती मंदीराच्या प्रांगणातील दगडी दिपमाळा विद्युत रोषणाईने प्रकाशित करण्यात आल्या होत्या. या सोहळ्यानिमित्त गजी नृत्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते